किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या नव्या महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. किशोरी पेडणेकर यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा किशोरी यांना अनुभव आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी यावेळी झालेली निवडणूक तब्बल ५० वर्षांनी बिनविरोध झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४, भाजपाचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, मनसेचा १ तर एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *