राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सेना – भाजपावर बोचरी टीका केली. ”युतीनं आता सरळ रामाच्या पादुका आणून मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर ठेवाव्या व राज्य कारभार करावा, नाहीतरी रामराज्यच आणायचे आहे.”आव्हाड यांनी ट्विटरवरुन युतीला सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी उशीर होत आहे.

मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झालेच पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे. मात्र सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *