सुधीर मुनगंटीवार यांनी आज महत्त्वाची अशी घोषणा केली आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. तसंच शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांनी आज पत्रकरा परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्रिपद हे भाजपाकडेच रहाणार आहे. राज्यात स्थिर सरकार देण्याच्या प्रयत्न भाजपा करणार आहे. आम्ही केवळ शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार आहोत, असं मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात आहे. यावर नितीन गडकरी म्हणतात, की भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्यातील सरकार बनले, असं वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.  मी दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *