अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.  फडणवीस यांनी शिवसेनेवर  आरोप केले की,  जे कधीच ठरलं नव्हतं त्यासाठी शिवसेनेचा हट्ट सुरु केला. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे असं ही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही असं ही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“>

Devendra Fadnavis: We had decided that we will never indulge in horse trading, that we will never try to break away any MLA. Those who said that we indulge in horse trading bought the entire horse stable. #Maharashtra pic.twitter.com/Ys72S9aPTA

— ANI (@ANI) November 26, 2019

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षातील दिग्गज नेते त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या पार्श्वभूमीवरच अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या नेत्यांमध्ये काल मॅरेथॉन बैठक झाली. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *