सिंचन घोटाळ्याचे पुरावे रद्दीत विकण्यात आले आहेत. तेव्हा रद्दीचा भावही चांगला होता, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या आमदारांचा शपथविधी आज पार पडला. एकनाथ खडसे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांचा पाठिंबा नको घ्यायला हवा होता. माझ्यासहित विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या नेत्यांना तिकीट देण्यात आलं नाही. जर या नेत्यांना तिकीट दिलं असतं तर पक्षाच्या पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या. मात्र आम्हाला डावलण्यात आलं. यावेळी त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर केली.

देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. २०१९ च्या निवडणूकीत खडसेंचे तिकीट कापण्यात आलं होत. त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आज  एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *