शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भाजपाने 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच भाजपने काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही अशा प्रकारची ऑफर दिली आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नाही असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं होतं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप विजय यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *