सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाची उघड चौकशी बंद करण्यात आली आहे. अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांनी एका पत्रकाव्दारे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरुन अजित पवारांवर टीका करत होते. मात्र, अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांना क्लीन चीट मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *