जनतेने आम्हाला बहुमत दिलेलं नाही. पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीला कौल दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी  विरोधातच बसणार आहे. सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी कोणतीही भूमिका बजावणार नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात कोणाची सत्ता येणार? शिवसेना कोणाला साथ देणार? राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. मात्र एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आघाडी काम करणार आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *