राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येतेय तसतशा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढत जातोय. दरम्यान, राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, सध्या राज्यात वंचितच्या उमेदवाराच्या वचननाम्याची चर्चा जोरात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांनी जाहीर केलेल्या वैयक्तिक वचननाम्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेनेचे अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे दिग्गज उमेदवारांचं तगडं आव्हान असणार आहे. असं असलं तरी देखील काळे यांनी आपल्या खास प्रचार शैलीनं त्यांना त्रासून सोडलं आहे. किरण काळे यांनी नगरमधील मतदारांसाठी स्वत:चा स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. खरतर हा वचननामा म्हणजे कुठल्याही आश्वासनांचा पाढा नसून तो प्रतिस्पर्धी उमेदवारांची ‘राजकीय कुंडली’ लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. वचननाम्याच्या अंतर्गत त्यांनी मतदारांना एकूण २१ वचनं दिली आहेत.

वंचितचे उमेदवार किरण काळे यांच्या वचननाम्यातील काही वचनं पुढीलप्रमाणे:

  • मी गुंडगिरी करणार नाही
  • मी कोणाचे खून करणार नाही
  • मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही
  • कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.
  • पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही.
  • कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही.
  • नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही.
  • राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही.
  • प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही.
  • एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *