उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघाताप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्याच्या साथीदारांवरील हत्येचा आरोप आरोपपत्रातून वगळण्यात आला आहे. जुलैमध्ये पीडित तरुणीची कार रायबरेलीमधील गुरबख्श गंज भागात पोहोचताच समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. दरम्यान, कारला धडक देणाऱ्या ट्रकचा नंबर आधीच काळ्या रंगाने पुसला होता. या अपघातात पीडितेच्या दोन नातेवाईकांचं निधन झालं होतं.

सीबीआयने यापूर्वी एफआयआरमध्ये सेगंर आणि इतर ९ जणांवर  खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी धमकी यासंबंधी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सीबीआयने भाजप आमदार सेंगरवरील खुनाचा आरोप मागे घेतल्याने देशात यावर मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *