यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य यांच्याऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असं मी उद्धव ठाकरेंना नक्की सांगेन असं व्यक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांना आदित्य ठाकरें मुख्यमंत्री होण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व आंबेडकरी मते आदित्य यांना मिळतील असं ही त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांना मराठी मते चांगली मिळतील.

मात्र आताच्या परिस्थितीमध्ये भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येईल. असं आठवले यांनी म्हटलं आहेत. परंतू राजकारणात काही होऊ शकतं. राज्यात सेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेलं. आदित्य ठाकरेंचा नंबर लागण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे. आदित्यऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव ठाकरेंना सांगेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *