आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं आज दुपारी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने  निधन झालं. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काकडे काकांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

अरुण काकडे यांनी रंगभूमीवर आपली वाटचाल पुण्यातून सुरू केली. अरुण काकडे, अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी 1971 साली आविष्कार नाट्यसंस्थेची पायाभरणी केली. आविष्कार या नाट्यसंस्थेने छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *