@दिवाकर शेजवळ

सणा सुदीच्या काळात भाड्याचा दर चढा

18 ऑक्टोबर 2019

चेअर कार : 1 हजार 660

एक्झिक्युटिव्ह कार : 2 हजार 450

28 ऑक्टोबर 2019

चेअर कार  : 3 हजार 295

एक्झिक्युटिव्ह कार : 4 हजार 570

वेगवान,आरामदायक प्रवास, अत्याधुनिक सोयी- सुविधा, सेवेला स्मार्ट स्टाफ, विविध इन्शुरन्स कव्हर्स यामुळे ‘तेजस एक्सप्रेस’ या आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) नव्या खासगी गाडीचे सध्या भारी कौतुक सुरू आहे. मात्र लखनऊ ते दिल्ली धावणारी तेजस एक्सप्रेस (82502) ही गाडी त्याच मार्गावरील ‘शताब्दी एक्सप्रेस'(12004) पेक्षा भरमसाठ भाडे वसूल करत प्रवाशांची केवळ पाचच मिनिटे वाचवत आहे. वेळेच्या बचतीबद्दलचे हे वास्तव लक्षात आल्यानंतर तेजस एक्सप्रेसने प्रवास केलेल्या प्रवाशांची विचारचक्रे फिरली आहेत.

तेजस एक्सप्रेसमधून प्रवासासाठी साधारण काळात चेअर कारसाठी 1280 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह कारसाठी 2 हजार 450 रुपये मोजावे लागतात. पण  तोच प्रवास शताब्दी एक्सप्रेस मध्ये चेअर कारसाठी 1 हजार 95 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह कारसाठी 1 हजार 855 रुपये देऊन करता येतो. त्यामुळे केवळ पाच मिनिटे वाचवण्यासाठी 500 ते 700 रुपयांचा भुर्दंड सोसायचा कशाला, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

लखनौपासून दिल्लीपर्यंतचे अंतर 511 किलोमीटर इतके आहे. त्या मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस ही गाडी तेवढे अंतर 6 तास 35 मिनिटांत कापते. तर, नुकतीच सुरू करण्यात आलेली तेजस एक्सप्रेस ही लखनऊ ते दिल्लीचा प्रवास 6 तास 30 मिनिटांत पूर्ण करते.

तेजस एक्सप्रेसला दोनच थांबे

1) गाझियाबाद (2 मिनिटे)

2) कानपूर (5 मिनिटे)

एकूण: 7 मिनिटे

शताब्दीला पाच थांबे

1) गाझियाबाद (2 मिनिटे)

2) अलिगढ (2 मिनिटे)

3) तुंडला (2 मिनिटे)

4) इटावा (2 मिनिटे)

5) कानपूर (5 मिनिटे)

एकूण 13 मिनिटे

तेजसमधून प्रवासासाठी भरघोस सवलती

  • उशिरामुळे प्रवास लांबला तर प्रत्येक प्रवाशाला 100 पासून 250 रुप्यापर्यंत भरपाई.
  • प्रवासात वस्तू चोरीला गेल्यास 1 लाखापर्यंत विमा संरक्षण.
  • अपघात विमा संरक्षण.
  • इतर गाड्यांप्रमाणे कन्सेशन कुणालाही नाही
  • रेल्वे इतर गाड्यांमधील प्रवासासाठी निरनिराळी 120 कन्सेशन्स देते. त्यात ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आदींचा समावेश आहे.

लखनऊ- दिल्ली मार्गावरील इतर गाड्या

1)  गरीब रथ : भाडे : 480

प्रवास : 7 तास 37 मिनिटे

2) सुहेलदेव:भाडे: 645

प्रवास: 8 तास 20 मिनिटे

3) गोमती : भाडे : 705

प्रवास : 9 तास 05 मिनिटे

खासगीकरणाद्वारे मोदी सरकारने रेल्वे कामगारांच्या नोकऱ्यावरच केवळ गंडांतर आणलेले नाही. प्रवाशांची लूट करतानाच रेल्वे गाड्यांमध्ये अनेक घटकांना दिली जाणारी कन्सेशन्सही हिरावून घेतली जात आहेत.

वेणू पी नायर

राष्ट्रीय सरचिटणीस

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *