भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर त्याने धोनी भविष्यात अजून खेळ खेळेल असा सूचक इशारा दिला आहे. धोनीने आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामगिरीने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

ज्यावेळी तुम्ही धोनीने केलेल्या विक्रमांच्या यादीवर कटाक्ष टाकला, तर तुम्हीच म्हणाल की चॅम्पियन इतक्या लवकर संपत नाहीत, असं दादाने म्हटलं आहे. जोपर्यंत मी बीसीसीआयचा अध्यक्ष असेन, तोपर्यंत सर्व खेळाडूंना पुरेपूर संधी देऊन त्यांचा योग्य मान राखला जाईल, असं गांगुली म्हणाला. दादाच्या या सूचक वक्तव्याने धोनीचे चाहते सुखावले आहेत.

दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी एकट्या सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आज सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मैदानात दादागिरी करणारा गांगुली बोर्डाच्या अध्यक्षपदी बसून किती दादागिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *