वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ६ विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींना सामुहिक पत्र लिहिण्यास नकार दिल्याने हे विद्यार्थी आंदोलन करत होते. निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दलित आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सहा विद्यार्थांवर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचं कारण सांगत विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

चंदन सरोज (एमफील, सोशल वर्क), नीरज कुमार (पीएचडी, गांधी अँड पीस स्टडीज), राजेश सारथी, रजनीश आंबेडकर (विमेन स्टडीज), पंकज वेला (एमफील, गांधी अँड पीस स्टडीज) आणि वैभव पिंपळकर (विमेन स्टडीज) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

देशात होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण, काश्मीरबाबत सरकारचे मौन, बलात्कार प्रकरणातील भाजपाच्या नेत्यांना दिलं जात असलेलं संरक्षण या विविध मुद्द्यांवर विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार होते. मात्र, याला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली होती.

या आंदोलनात सुमारे १०० विद्यार्थी होते. मात्र प्रशासनाने निवडक विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या आंदोलनात सवर्ण समाजातील विद्यार्थी देखील होते. पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. असं निलंबित विद्यार्थी चंदन सरोज याने म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *