शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सेनेचा वचननामा जाहीर केला. युतीची सत्ता राज्यात आल्यावर 10 रूपयांत गरिबांना जेवण आणि 1 रूपयांत नागरिकांची आरोग्य चाचणी करणार असल्याचं सेनेनं म्हटलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.

आता ऐकायला येतंय की, १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत, असं शरद पवार म्हणाले. यापूर्वी, शिवसेनेकडून 1 रुपयात झुणका भाकर सुरु करण्यात आली होती. त्याचं काय झालं? आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय का स्वयंपाक करायला, असं म्हणत शरद पवारांनी १० रुपयाच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेना सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार म्हणजे देणारच, असं वचन उद्धव यांनी दिलं आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच आम्ही आमच्या जाहीरनाम्यातील घोषणा केल्या आहेत, असं सेनेनं म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *