या सरकारला शेतकरी आणि शेतीविषयी कोणत्याच प्रकारची आस्था नाही. भाजपाचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. तेव्हा त्यांना तुमच्या दारात देखील उभं करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युतीसरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसंच केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर पवारांनी सरकारला धारेवर धरलं.

शरद पवार यांनी आज अहमदनगर येथे प्रचार सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली. यासरकारमुळे हजारो लोकांचे रोजगार गेले आहेत. 500,1000च्या नोटा बंद करुन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना बँकांच्या बाहेर उभं केलं. यावेळी त्यांनी पक्ष बदलणाऱ्यांवर भाष्य केलं. ज्यांनी पक्ष बदलला आहे, त्यांच्यापासून आमची सुटका झाली आहे. असंही त्यांनी नगरच्या प्रचारसभेत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *