भाजपाचे अध्यक्ष अमित शाह वारंवार प्रचार सभेत कलम ३७० वरून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले मोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव आहे,” अशी जहरी आणि खोचक टीका पवार यांनी शाह यांच्यावर केली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कलम ३७०चा वारंवार उल्लेख केला जात आहे. यासह राष्ट्रवादी आणि शरद पवार हे कलम ३७०च्या विरोधात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणं शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचं बोलतच नाहीत. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला की..,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

एक गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे, असं शिरूर येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *