महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, भाजप शिवसेनेशिवाय राज्य करु शकत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच यावेळी शिवसेनेचे 100 हून अधिक आमदार निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनाला 100 जागा मिळतील असा दावा केला आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्य नाही. एक्झिट पोल आपल्या पध्दतीने काम करत असतात, पोल घेण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *