आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची व्हायरल लग्नपत्रिका सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर दोघांची लग्नपत्रिका काही तासात व्हायरल झाली. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या नात्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. दोघेही अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसतात. आतातर त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातला आहे. पण ही व्हायरल पत्रिका खरी आहे का? तर नाही.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पत्रिका त्यांच्या फॅन्सनी व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. या लग्नपत्रिकेत आलिया भट्टच्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग Aliya असं लिहिलंय पण आलिया भट्ट मात्र तिचं स्पेलिंग Alia असं लिहते. तसंच, पत्रिकेत आलिया भट्ट ही मुकेश भट्ट यांची कन्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, आलियाच्या वडिलांचं नाव महेश भट्ट असून मुकेश भट्ट तिचे काका आहेत. या पत्रिकेतील तारखेमध्येही गोंधळ घालण्यात आला आहे. या पत्रिकेला पाहून दोघांच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याआधीही दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *