राज ठाकरे यांनी प्रचार सभेत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्यावर सरकारवर टीका केली आहे. आज पीएमसीच्या खातेदारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बॅंकेच्या खातेदारकांनी आपल्या अडचणी राज ठाकरे यांच्या समोर मांडल्या. पीएमसी बॅंक भाजपाच्या लोकांमुळे बुडाली असा थेट आरोप राज यांनी भाजपावर केला. आपल्या प्रचार सभेत राज यांनी पीएमसीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी नेत्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामुळेच पीएमसीच्या खातेदारकांनी राज यांची भेट घेतली आहे.

पीएमसीच्या खातेदारकांनी समोर अनेक अडचणी आहेत. कोणाकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत. कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. कोणाकडे औषधासाठी देखील पैसे नाहीत असे असंख्य प्रश्न खातेदारकांनी राज यांच्यासमोर मांडले आहेत. राज यांनी प्रचार सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावरून सत्ताधारी नेत्यांवर टीक केली आहे. मनसेच्या या भूमिकेमुळं खातेदारकांनी आज राज यांची भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *