पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे संतप्त खातेदारांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरलं. बँकेने आमचे पैसे परत करावे असं म्हणतं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खातेदारांनी घेराव घातला आणि निदर्शनं केली. तसंच अर्थमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खातेदारकांकडून करण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खातेदारकांच्या रोषाला सामोरं जाव लागलं. निर्मला सीतारामन यांनी खातेदारांना आश्वासन दिलं की, आम्ही लवकरच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्याशी याविषयी चर्चा करू. बँकेने आमचे पैसे परत करावे. ज्या लोकांनी हा घोटाळा केला त्यांना शिक्षा द्यावी. परंतु आमचा दोष नसतानाही आम्हाला याची शिक्षा मिळत आहे. खातेदारांनी अशी प्रतिक्रिया माध्यमाच्या प्रतिनिधींना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *