राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सावरगावच्या मेळाव्यात दिलेल्या भाषणामुळे अमित शाह आणि पंकजा मुंडे यांना सामान्य नागरिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. अमित शाह यांनी भाषणात स्थानिक प्रश्नांविषयी कोणतेच मुद्दे मांडले नाहीत. यावर सामान्य नागरिकांनी पंकजा मुंडे आणि अमित शाह यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. अमित शाह आणि पंकजा यांनी कलम 370 आणि देशभक्तीच्या मुद्द्यांवर जोर दिला. याच मुद्द्यावरुन बीडच्या नागरिकांनी या दोन नेत्यांना प्रश्न विचारले आहेत.

कलम 370 रद्द केल्या मुळे अमित शहा ला सावरगाव (बीड) येथे 370 तोफांची सलामी …

अरे वाह,
हा मुद्दा झाला का प्रचाराचा?
आता तरी सुधर रे
जेवढ्या शेतकऱ्यांचा खून झाला (आत्महत्या नाही खून आहे तो )मोटाशेट तेवढे तुमच्या पक्षाचे नेते न तुम्ही त्या तोफेच्या तोंडी जा
तेवढाच भार कमी होईल..

— Kundan chavhan (@Kundanchavhan01) October 8, 2019

 

स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष न देता आम्ही कशा प्रकारे कलम 370 रद्द केलं हे लोकांना सांगू नका अशा प्रकारचे ट्वीट केलं आहे. कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा आहे का? अशा प्रकारचे प्रश्न ट्वीटच्या माध्यमातून विचारले जात आहेत. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच देशातील आर्थिक मंदी, बेरोजगारी या विषयावर अमित शहा यांनी बोलावं. पंकजा मुंडे यांनी दरवर्षी प्रमाणे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपली हजेरी लावली होती. त्यांच्या भाषाणामध्ये कोणत्याही स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली नाही, त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *