आरे वृक्षतोडीविरोधातील याचिका काल मुंबई हायकोर्टाने फेटाळली. यामुळे आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. काल संध्याकाळी सातच्या सुमारास आरेतील झाडे कापायला सुरुवातही झाली. काल संध्याकाळपासून चारशे झाडे कापली गेली आहेत. झाडे कापली जात आहेत, हे समजताचं तिथे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी जमले. आंदोलकांना कारशेडच्या जागी प्रवेश दिला गेला नाही तेव्हा आंदोलकांनी रस्त्यावरच बसत ठिय्या दिला. रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये संर्घष सुरु झाला. यामुळे आरे परिसरात तणावाचं वातावरण होतं आहे.

काल रात्रीपासून आरे परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले. यानंतर पोलीस आरे परिसरात पोहचले. काल रात्रीपासून अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या आरे कॅालनी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी जमलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच आरे कॉलनीत वार्तांकन करण्याऱ्या पत्रकारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *