मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात प्रचारसभेसाठी फिरत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. मात्र, मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद समाज माध्यमांवर उमटताना दिसले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिल्या राफेल विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला. यावरून आता मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू मिरची न बांधल्याने त्यांचं चाक मातीत रुतलं, असा टोला अनेकांनी लगावला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *