चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यात चैन्नईत अनौपचारिक बैठक होणार आहे. मात्र मोदींच्या या दौऱ्याला तामिळनाडूतील स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. MODI NO ENTRY या आशयाचे बॅनर तामिळनाडूच्या नागरिकांनी लावले आहेत. सध्या ट्विटवर #GoBackModi हा हॅशटॅग वापरुन मोदींच्या दौऱ्याला विरोध होतं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी तामिळनाडूला गेले होते, तेव्हा त्यांना विरोध करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हाही त्यांना विरोध केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी चेन्नईच्या आयआयटीमध्ये पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळीही त्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र तामिळनाडूतील नागरिकांनी #TNwelcomesXiJinping हा हॅशटॅग वापरुन जिनपिंग यांचे स्वागत केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *