हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर द्या, नाही तर काचा फुटतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला. प्रसाद ओक दिग्दर्शित असलेला ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर दोन दिवसांनी म्हणजेच २६ ऑक्टोबरला अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा मनसे स्टाईल इशारा दिला आहे.

दरम्यान, बुधवारी २३ ऑक्टोबरला मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावी यासाठी आम्ही भांडतोय आणि तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामांना सामोरे जा,’ असा इशारा मनसेनं दिला आहे.

उत्तम कथा, दिग्दर्शन, गाणी, अव्वल दर्जाची स्टारकास्ट या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चं असं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. मात्र अनेकवेळा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नाहीत. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *