मराठी अभिनेत्री पूजा जुंजर आणि त्यांच्या नवजात बाळाचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथेही घटना घडली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ही घटना घडली.

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पूजाची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. पूजा यांना पुढील उपचारांसाठी हिंगोलीमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र पूजा यांना हिंगोलीतील रुग्णालयात हलवण्यासाठी केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. जर वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर पूजा आणि बाळाचा जीव वाचला असता असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. पूजा यांनी फाल्गुनराव जिंदाबाद, देवी माऊली आम्हा पावली या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बाळंतपणासाठी पूजा यांनी काही दिवसांची सुट्टी घेतली होती. या घडनेमुळे राज्यातील आरोग्य
सेवेवर प्रश्न उपस्थितीत होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *