कठुआ बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. एसआयटीच्या सदस्यांनी साक्षीदारांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला होता. त्याचबरोबर साक्षीदारांना धमकावाल्याचा आरोप या सदस्यांवर ठेवण्यात आला आहे. साक्षीदार असणारे सचिन शर्मा, नीरज शर्मा आणि साहिल शर्मा यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने एसआयटीच्या सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहे.

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या चिमुरडीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी इतर तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यावेळी पीडीपी-भाजपा सरकारने एसआयटी गठीत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *