आपल्या देशाला संभाजी भिडे यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. तसं झालं तरच आपला देश वाचेल  असं वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी केलं. दसऱ्याच्या दिवशी शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजयसिंग सेंगर यांनी हे वक्तव्य केलं. आपल्या देशात हिंदूंचा छळ होत आहे. भिडे गुरुजी हिंदू धर्मगुरु आहेत. सध्या देशातील हिंदूंची अवस्था चांगली नाही. आज देशाला धर्मशिक्षेची नितांत आवश्यकता आहे, असं सेंगर यांनी म्हटलं आहे.

काल दुर्गामाता दौडीची  सांगता झाली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने आणि सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजपूजन करण्यात आलं. शिवप्रतिष्ठान दरवर्षी दुर्गामाता दौडीचे आयोजन करते. यंदाचे हे 36 वर्ष आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताने जगाला बुद्ध दिला पण बुद्धाचा काही फायदा नाही. छत्रपती संभाजी महाराजांचेच विचार आपल्याला तारणार आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *