बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. देशासह राज्यात सध्या राजकारणाने पातळी सोडली आहे. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली असून ही घटनाच दुर्दैवी आहे. मला व माझ्या कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.

दरम्यान, निवडणूक लढवणार नसलो तरी राजकारण सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. भावनिक राजकारण मला आवडत नाही. तसं असतं तर मी मतदानाअगोदर हा निर्णय जाहीर केला असता. मला निवडणुकीत मेरिटवर विजय मिळवायचा होता. त्यामुळे हा निर्णय मी मतदानानंतर घेतला, असं ते म्हणाले.

वसई, नालासोपारा आणि भोईसर या तिन्ही ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणार आहेत. जर आमचे उमेदवार पराभूत झाले तर तो नक्की ईव्हीएम घोटाळा असेल, असंही त्यांनी म्हटलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *