राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. आरएसएसही दहशतवादी संघटना आहे. संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला, असा खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी केला. पी. विजय शंकर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेऊन संघाचं चेहरा उघड केला.

मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केलं. या बारा वर्षांच्या कार्यकाळात अनेक अनुचित गोष्टी घडल्या. त्या गोष्टी चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम केलं. बॉम्बस्फोटांसारखे अश्लाघ्य कृत्य संघाने केलं असून मी देखील त्याचा एक भाग होतो. या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. पुरावे संपवण्यासाठी संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. दरम्यान, संघाचा काळा चेहरा सर्वांसमोर आण्यासाठी मी ‘मी देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे’  हे पुस्तक लिहिलं आहे, असं विजय शंकर म्हणाले.

दरम्यान, संघाचं काम असहाय्य झाल्याने अनेक स्वयंसेवकांनी विष प्राशन करून तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. तसंच अनेक निराश झालेले संघ प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी लवकरच दिल्ली येथे संघातील बढय़ा नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असल्याचंही विजय शंकर म्हणाले. या संदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी समोरा-समोर चर्चा करायला तयार असल्याचंही विजय शंकर यांनी सांगितलं. दरम्यान, भारत वाघमारे यांनी विजय शंकर यांच्या वक्तव्याचा मराठीत अनुवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *