आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी भारतातील आणि जगभराच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून भारतात देखील मंदीचे परिणाम दिसू लागले आहेत. तसंच जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर गेल्या दहावर्षातील निचांकी पातळीला पोहोचण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागेल असं क्रिस्टलीना यांनी म्हटलं आहे.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी सांभाळला आहे. क्रिस्टलीना जॉर्जिवा यांचे हे पहिले भाषण होते. आपल्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की, दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत होती. जीडीपीचा विचार केल्यास ७५ टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरु होता. मात्र आता ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज क्रिस्टलीना यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी  निर्माण झाली आहे. जागतिक व्यापार देखील कमी झाला आहे. भारत आणि ब्राझील या उभरत्या बाजारपेठांवर जागतिक मंदीचे परिणाम होणार आहे, असं क्रिस्टलीना यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *