मिस कोहिमा ब्यूटी पेजेंट 2019 ही सौंदर्य स्पर्धा नागालँड येथे पार पडली. या स्पर्धेदरम्यान मॉडेल्सला प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुला पतंप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तु त्यांच्याशी काय बोलशील?  यावर वीक्यून्यो साचू ही मॉडेले म्हणते‘जर मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर मी त्यांना सांगेन की गायींवर लक्ष देण्यापेक्षा भारतातील महिलांच्या परिस्थीतीकडे बघा.’तीच्या या उत्तराने सर्वत्र हास्याची लाट पसरली. सोशल मीडियावर या स्पर्धेतील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Miss Kohima 2019 beauty pageant:

“If PM of our country Modi invites you to chat with him, what would you say?”#MissKohima #NarendraModi pic.twitter.com/sQKZn29WHO#MissKohima

— ???ãã??‍? (@JimDaiez) October 15, 2019

या व्हायरल व्हिडीओला एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. वीक्यून्यो साचू ही या स्पर्धेची सेकंड रनरअप ठरली. या स्पर्धेतील साचू हीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ती केवळ १८ वर्षांची आहे. या स्पर्धेत २३ वर्षांची Khrienuo Liezietsu ने मिस कोहिमाचा किताब पटकावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *