मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी शाळेच्या आवारात या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेच पोलिसात तक्रार करण्यात आली. विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी देशभरात विविध ठिकाणी रावण दहन करण्यात येतो. तसंच या दिवशी देशभरात शस्त्रपूजा ही केली जाते.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री  देवीच्या विसर्जनाच्या वेळी काही लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारातमध्ये सहा लोक जखमी झाले. पोलिसांनी तीन लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. सध्या जखमीवर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *