कमळाला मत देणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा, असं वादग्रस्त विधान खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. कर्जत जामखेड येथे केंद्र सरकारने दिलेले दाेन हजार रुपये घेता आणि मत दुसऱ्या पक्षाला करता म्हटलं होतं. यावर छात्रभारती आक्रमक झाली आहे. छात्र भारतीकडून विखेंना दाेन हजारांचा चेक पाठविण्यात आला आहे.

छात्रभारतीने एक प्रसिद्ध पत्रक काढत सुजय विखे पाटील यांच्यावर आराेप केले आहेत. खासदार सुजय राधाकृष्ण विखे यांनी कमळाला मत देणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा या प्रकारचं विधान करुन राज्यातील शेतकऱ्यांच्या मताची किंमत करत शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आमच्या मताची किंमत दाेन हजार रुपये ठरविणाऱ्या विखेंचा निषेध म्हणून आम्ही दाेन हजार रुपयांचा चेक पाठवून सुजय विखेंना आवाहन करत आहाेत की, त्यांनी लाेणीमध्ये कमळाला साेडून काेणालाही मत द्यावं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *