बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ सध्या कोलकात्यामध्ये दुर्गापूजेचा आनंद घेत आहे. आपल्या पतीसोबत तिने दुर्गापूजा केली. यामुळे नुसरतवर कट्टरपंथी मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहे. नुसरतला आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त दुसऱ्या धर्माची कामे करायची असेल तर तिने आपल नाव बदलाव असं देवबंदी उलेमांनी म्हटलं आहे.

नुसरत जहाँने इस्लाम धर्माचा अपमान केला आहे. तसंच इस्लाममध्ये अल्लाशिवाय इतर कोणत्याही देवाची पूजा करण हे चूकीचं समजलं जातं. त्यामुळे जर तिला अशी कामे करायची असेल तर तिने आपल नाव बदलाव असं उलेमांनी म्हटलं आहे. यावर नुसरतने प्रतिक्रिया दिली आहे. मला जे करायचं आहे ते मी करणार असं तिने म्हटलं आहे.

नुसरत जहाँने निखिल जैन सोबत लग्न केलं आहे. त्यावेळी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. अभिनेत्री नुसरत जहाँ या पश्चिम बंगालच्या बशीरहाटच्या खासदार आहे. संसदेत तिने पाश्चिमात्य कपडे घातले होते. तेव्हा ही नुसरत जहाँवर टीका करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *