नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत मनमोकळा संवाद साधला. मोदींनी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्या कर्तृत्वाचा भारताला अभिमान आहे असं म्हणत मोदींनी अभिजीत बॅनर्जी यांचे कौतुक केलं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्थज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. अनेकांनी सोशल मीडियावरून बॅनर्जी यांना ट्रोलही केलं होतं. बॅनर्जी हे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अर्थज्ज्ञ इस्तर डुफ्लो आणि मायकल क्रेमर यांच्यासह अभिजीत बॅनर्जी यांना २०१९ चे नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *