कल्याणमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते जागावाटपावरुन नाराज असल्याने त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. विधानसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सेनेमधील बंड काही कमी होतं नाही.

 

भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तरी देखील दोन्ही पक्षामधील बंडखोरी काही कमी होतं नाही आहे. या बंडखोरीचा फटका युतीला बसणार आहे. स्थानिक नेते धनंजय बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *