काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या ५० सेलिब्रेटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. यावर सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राशी संबंधित १८० हुन अधिक नामवंतांनी याचा निषेध करत मोदींना लिहिलेल्या पत्राचं समर्थन केलं आहे.

एक पत्र लिहित मॉब लिंचिंग विरोधात लिहिलेल्या पत्राचं समर्थन केलं आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये अभिनेते नसरुद्दीन शाह, लेखक नयनतारा सेहगल, नर्तिका मल्लिका साराभाई, इतिहासकार रोमिला थापर, लेखक आनंद तेलतुंबडे, गायक टी. एम. कृष्णा आणि कलाकार विवान सुंदरम यांचा समावेश आहे.

आपल्यापैकी बरेचजण दररोज मॉब लिंचिंग विरोधात, लोकांचा आवाज शांत करण्यासाठी, नागरिकांचा छळ करण्यासाठी न्यायालयाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात बोलतील, असं पत्रात म्हटलं आहे.

तीन ऑक्टोबरला बिहारमधील कोर्टाच्या आदेशानुसार दिग्दर्शक श्याम बेनेगल, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन मणिरत्नम, इतिहासकार रामचंद्र गुहा, गायिका शुभा मुगदल, अभिनेत्री आणि दिग्दर्शक अर्पणा सेन, अनुराग कश्यप यांच्यासह ५० सेलिब्रेटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. या सेलिब्रेटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलैमध्ये पत्र लिहून मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली होती.

देशद्रोहासह भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या अनेक कलमांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आली. ते देखील जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, सरकारवर टीका करण्यासाठी देशद्रोहाचे आरोप लावता येणार नाहीत.

दरम्यान, १८० हुन अधिक सेलिब्रेटींनी मोदींना लिहिलेल्या पत्रातील प्रत्येक शब्दाचं समर्थन करत एक नवीन पत्र शेअर केलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *