एमआयएम वंचित मधून बाहेर पडली असून आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आम्हाला केवळ आठ जागा देत आहेत. हे आम्हाला मान्य नसून आम्ही आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आम्ही सुमारे दोन महिने जागावाटपाबाबत चर्चा करत होतो. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही असं एमआयएमने म्हटलं आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी केवळ आठ जागा एआयएमआयएमला आघाडीचे भागीदार म्हणून देण्याचे व्हीबीएने सांगितलं. यादीमध्ये औरंगाबाद मध्यवर्ती एआयएमआयएमच्या जागेचा समावेश नसल्यामुळे हे  अस्वीकार्य आहे.

आमचे पक्षाचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनीही बाळासाहेबांशी अनेक बैठका घेतल्या होत्या. बाळासाहेबांनी ओवेसी यांना एआयएमआयएमला 8 जागा देऊ याबाबतचा ईमेल पाठवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत एआयएमआयएमने २०१४ च्या निवडणूकीमध्ये २४ जागा लढवल्या होत्या. आम्ही औरंगाबाद आणि भायखळा येथून अनुक्रमे दोन आमदार जिंकले होते आणि नऊ जागांवर आम्ही दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होतो. आज पक्षाकडे महाराष्ट्रात सुमारे १५० नगरसेवक आणि विविध जाती व समुदायातील नगरसेवक आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत जिथे आमचे २6 नगरसेवक आहेत, आमचे विरोधी पक्षनेते आणि एएमसी मधील गटनेते सरिता अरुण बोर्डे आणि श्री गंगाधर ढगे हे अनुसूचित जातीतील आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचा आम्ही आदर आणि सन्मान करतो. आम्ही त्यांना आणि व्हीबीएला शुभेच्छा देतो. जरी आमची युती झाली नाही तरीही आम्ही वचनबद्ध आहोत आणि समाजातील दुर्बल घटकांकडून उत्पीडित वर्गाचे प्रश्न पुढे घेऊन जाऊ. औरंगाबादमध्ये घेण्यात येणारी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक एआयएमआयएम जारी करेल असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *