वंचित बहूजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, आमची युती ही ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. ओवेसी सांगेपर्यंत युती कायम आहे असं बोलून त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

वंचितचे धनराज वंजारी, राजेंद्र महाडोळे आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली होती. मात्र काँग्रेसकडून आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्याने आम्ही काँग्रेसशी युती करणार नाही. अनंत चतुर्दशीनंतर वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *