कॅा. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. सचिन अंदुरेसह दोन मारेकऱ्यांना मुंबई, पुणे या शहारतून अटक करण्यात आली. आज या तिघांना कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 16 फेब्रुवारी 2015 रोजी जेष्ठ विचारवंत कॅा. गोविंद पानसरे त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये कॅा. पानसरे यांचा मृत्यू झाला.

सचिन अंदुरे याला या आधी डॅा.नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. कॅा.पानसरे हत्या प्रकरणात यापुर्वी शरद कळसकर याला अटक केली आहे. पानसरे हत्याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 12 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *