देशातील बेरोजगारीचं प्रमाण उच्चांकावर आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमि (CMIE) या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशात बेरोजगारीचं प्रमाण तीन वर्षांच्या उच्चांकावर आहे. लोकं नोकऱ्या शोधत आहेत. मात्र, नोकऱ्या नसल्यामुळे हताश घेत असल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे.

ऑगस्टमध्ये बेरोजगारीचं प्रमाण ८.४ टक्के

अहवालानुसार ऑगस्टमध्ये बेरोजगारीचं प्रमाण ८.४ टक्के होतं. जे तीन वर्षांतील उच्चांक स्तर आहे. याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये बेरोजगारी या स्तरापर्यंत पोहोचली होती. अहवालामध्ये ऑगस्टमधील साप्ताहिक बेरोजगारीचं प्रमाण देखील सांगितलं आहे. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला बेरोजगारीचं प्रमाण ८ ते ९ टक्के होतं.

जुलैमध्ये साप्ताहिक बेरोजगारीचं प्रमाण ७ ते ८ टक्के इतकं होतं. यावरून ऑगस्टमध्ये दर आठवड्याला बेरोजगारी एका टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचं प्रमाण ९.६ टक्के होतं. तर, ग्रामीण भागात बेरोजगारीचं प्रमाण ७.८ टक्के एवढे  होतं, असं अहवालामध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *