शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या राजीनाम्यासाठी खास व्यवस्था केली. भास्कर जाधव यांनी आपला राजीनामा सही करून औरंगाबादमध्ये विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ भागडे यांच्याकडे पाठवला असता. पण, या सर्व प्रक्रियेला विलंब होईल म्हणून उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्यासाठी चक्क विमानाची व्यवस्था केली. नेत्यांना सेना-भाजपमध्ये जाण्याची जेवढी घाई आहे तेवढीच घाई सेना-भाजपच्या प्रमुखांना देखील आहे, असच दिसून येतंय. दरम्यान, भास्कर जाधव आज दुपारी दोन वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभेच्या अध्यक्षांना देखील घाई

भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क मोटारसायकलवरून आले. एवढंच नव्हे तर भास्कर जाधवांचा राजीनामा देखील लगेच मंजूर केला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क मोटारसायकलवरून आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *