चितगाव येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर २२४ धावांनी विजय मिळवला आहे. पहिल्या डावात अफगाणिस्तानने ३४२ धावा केल्या. राशिद खानने पाच बळी घेत यजमान बांगलादेशला २०५ धावांमध्ये रोखलं.

अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात १३७ धावांच्या आघाडीसह सहा गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा करत बांगलादेशला ३९८ आव्हान दिलं. मात्र, राशिदच्या फिरकीसमोर बांगलादेशचा डाव १७३ धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या डावात रहमत शहाच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने तीनशेचा आकडा पार केला. अफगाणिस्तानसाठी कसोटीमध्ये शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला.

राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळताना अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू झाला. बांगलादेश लक्ष्याचा पाठलाग करताना १७३ धावांवर सर्वबाद झाला. राशिद खानने दुसऱ्या डावात सहा गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *