मुख्यमंत्रीपदाचं खूळ डोक्यात घेतलेल्या तरुणाने बीड ते लालबागच्या राजपर्यंत दंडवत घालत पायी यात्रा पूर्ण केली आहे. बीड जिल्ह्यातील देवगाव दहिफळमधील श्रीकांत विष्णू (३५) असं या तरुणाचं नाव आहे.

श्रीकांतला एक दिवसासाठी मुख्यमंत्री व्हायचं आहे. यासाठी त्याने थेट राज्यपालांना अर्ज लिहून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. श्रीकांतला शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यायचा आहे.

श्रीकांतने २०१६ साली लालबागच्या राजाला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यासाठी नवस केला होता. त्यावेळी त्याने तिथे नारळ फोडला. नारळ फोडताना उभा फुटला. त्यामुळे या तरुणाला लालबागच्या राजाने कौल दिला असं वाटलं. नवस पूर्ण करण्यासाठी या तरुणाने त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत तसंच पायी चालत आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *