अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या द फॅमिली मॅन या वेब सीरीजला आरएसएसने विरोध केला आहे. संघाच्या ‘पांचजन्य’ या मासिकातून द फॅमिली मॅनवर लेख लिहिण्यात आला आहे. द फॅमिली मॅन हिंदूंची बदनामी करत आहे. तसंच सीरीजमध्ये काश्मीर विषयी चूकीचे संर्दभ देण्यात आले आहेत.

या वेब सीरीज सेन्सॉर बोर्डच्या अधीन येत नाहीत. अशाप्रकारच्या वेब सीरीज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र या वेब सीरीजवर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसते.या वेब सीरीजमध्ये शिव्या आणि अश्लील दृश्य असतात. या वेबसिरीजमध्ये काश्मीर आणि भारतातील दंगलीविषयी अनेक संवाद आहेत. हे संवाद भारत विरोधी आहेत, असंही या लेखामध्ये म्हटलं आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली द फॅमिली मॅन ही वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही वेब सीरीज भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली, काश्मीर या विषयांवर भाष्य करते. श्रीकांत तिवारी हा मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रमुख आहे. मनोज वाजपेयीने या वेब सीरीजमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारलेली आहे. या वेब सीरीजमध्ये मनोज वाजपेयीबरोबरच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी हे कलाकार देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *