देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितून जात असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने आर्थिक मंदी स्विकारुन त्यातून सावरण्यावर भर दिला पाहिजे, असं मनमोहन सिंग म्हणाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार देश ज्या पद्धतीने वेगाने पुढे जात आहे, तसं चित्र यापूर्वी दिसलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यावर १२ सप्टेंबरला ट्विट केलं होतं.

विकासाला नेहमीच आमचं प्राधान्य आहे. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. १०० दिवसात लोकांच्या कल्याणासाठी निर्णय घेतले आहेत. ही मात्र सुरुवात आहे. पाच वर्ष अजून बाकी आहेत.

              – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर सात वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ५ टक्के झाला आहे.

आर्थिक मंदीवर मनमोहन सिंग यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही कोणालाही विचारा, सर्वजण हेच सांगतील की, अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून जात आहे. सद्यस्थितीतील चिंताजनक बाब ही आहे की, सरकारला याची जाणीव नाही आहे. सरकार मान्य करत नाही आहे की, आपण मंदीमध्ये अडकलोय.

       – मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

 काँग्रेसच्या मिटिंगनंतर मनमोहन सिंग पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले –

रियल इस्टेट पासून उत्पादन क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात मंदी आहे. परिस्थिती बदलली नाही तर याचे वाईट परिणाम नोकऱ्यांवर होतील. विकासदर घटत असून आता ५ टक्क्यांवर आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास हा अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत असल्याचं आयएमएफचे प्रवक्ते गेरी राईस म्हणाले. नवी आकडेवारी लवकरच आमच्याकडे येईल. परंतु अलीकडे असलेला भारताचा आर्थिक विकास हा कमकुवत आहे. यासह कॉर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामकांच्या अनिश्चिततेमुळे आणि काही बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कमकुवतपणामुळे भारताच्या आर्थिक विकासावर वाईट परिणाम झाला आहे.

            – गेरी राईस, आयएमएफ प्रवक्ते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *