@सचीन गोडांबे

हजारो वर्षापासून या देशात शिक्षणासाठीच संघर्ष सुरू आहे. शिक्षण हे कुण्या एका जातीची मक्तेदारी असू नये म्हणूनच 1950 ला लागू झालेल्या संविधानात आर्टिकल 45 मध्ये सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे अशी तरतूद केली आणि त्याच टार्गेट 10 वर्ष होतं.

जर संविधान 100 %लागू झालं असतं तर आज देशात जे 30 % लोकं निरक्षर आहेत ते दिसले नसते. आणि आज खाजगी कॉन्व्हेंट शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची लूट केली नसती.

शिक्षणाने मस्तक सुधारते. आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढेही लाचारीने नतमस्तक होत नाही.
म्हणजे आत्मसन्मानाने जीवन जगण्यास शिक्षणाची खूप मोठी भूमिका असते.

शिक्षण हे वाघीनीच दूध आहे असे म्हटले. शिक्षणाने विचारात क्रांती निर्माण होते but आज शिक्षणात भेदाभेद दिसतो. उद्योगपती श्रीमंत व्यक्तीच्या मुलाची शाळा, शिक्षण, सिल्याबस, सोईसुविधा आणि  गरिबांच्या मुलांची शाळा, सुविधा, सिल्याबस यात जमीन असमानाचा फरक दिसतो.

शिक्षणात भेद करून मेरिट च्या बाता कशा करता येतील?  मेरीटचा आणि शिक्षणाचा संबंध वेगवेगळा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणूनच संविधानाच्या आर्टिकल 15 (4) मध्ये पिढ्यान्पिढ्या ज्या मागास समाजाला ज्ञान आणि धनापासून वंचित ठेवण्यात आलं होतं त्यांना आर्टिकल 15 मध्ये शैक्षणिक संरक्षण म्हणून प्रतिनिधित्व बहाल केलं. ज्याला अज्ञानामुळे राखीव किंवा आरक्षण म्हणतात.

प्रतिनिधित्व म्हणजे हिस्सा, भागीदारी, हिस्सेदारी. होय. देशाच्या आजच्या बिकट स्थितीला दुरुस्त करण्यासाठी देशातील सर्व वर्गाला प्रत्येक संस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळायली पाहिजे. जीसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी ह्या धर्तीवर  सर्व संस्थेत सर्वांना भागीदारी मिळायला पाहिजे. असो.

बँकेचे विलीनीकरण करण्याऐवजी म्हणजे राजाभाऊचं 10 किराणा शॉप आहेत. वेगवेगळ्या एरियात ती दुकानं आहेत. त्यातील काही किराणा शॉप नुकसानीत आहेत. ग्राहकांनी पैसा डूबवल्यामुळे नुकसानीत गेले. तर राजाभाऊंनी ती त्या 10 पैकी 9  दुकानांचं एकाच दुकानात विलीनीकरण करून मोठं शॉप निर्माण केलं. 9 दुकानाचा माल त्या एका शॉप मध्ये भरला म्हणजे ते दुकान खूप मोठं दिसतं. याचा अर्थ फायदा झाला असा होत नाही.

राजाभाऊंनी त्या 9 दुकानाला बंद करण्याऐवजी त्या 2 शॉपकडे लक्ष देऊन त्यातील त्रुटी दूर करून त्या सर्व शॉप ला मोठं बनविण्यासाठी मेहनत घेतली असती तर आज राजाभाऊचे 10 मोठे शॉप असते.

शब्दाची मर्यादा लक्षात घेऊन शॉर्ट मध्ये बँकेच्या विलीनीकरण संदर्भात थोडक्यात लिहिले आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. शेवटी जीवन जगण्याला जसे ऑक्सिजन ची गरज असते सेम तीच गरज माणसाच्या उच्च शिक्षणाबद्दल आहे. शरीराला जगायला ऑक्सिजन पाहिजे तसंच विचाराने जगायला शिक्षण पाहिजे म्हणून सर्व खाजगी शिक्षणाचे सरकारी शाळेत विलीनीकरण करून देशात समानतेच्या आधारे संविधानाचा आधार घेऊन एक देश एक शिक्षण ची तरतूद करायला पाहिजे.

असो. याविषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. शेवटी पुन्हा एकदा शिक्षण म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजन एवढं महत्व शिक्षणाच आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *